गंगापुर प्रतीनिधी सलीम शाह
निमगाव व गोंदगाव येथे सर्व ग्रामस्थच्यावतीने आमदार रमेश बोरनारे , शिक्षण व कृ उ बाजार समिती सभापती संजय पा निकम, प.स.सभापती सिनाताई मनाजी पा मिसाळ, उपसभापती राजेंद्र पा मगर यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी #आमदार_साहेब यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याचे पूजन करून विविध विकास कामांचे भूमिपूजन व #शिवसेना शाखेचे उद्घाटन केले व सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परिक्षेत निमगाव येथील काही विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आल्याने त्यांचा सत्कार #आमदार_साहेबांनी केला. याप्रसंगी मा.सभापती लक्ष्मण मामा, उपतालुकाप्रमुख बबनतात्या जाधव, गोरख आहेर,मा.उपसभापती राजेंद्र पा चव्हाण, विभागप्रमुख नदंकुमार जाधव, आनंद निकम सर, राजुभाऊ निकम, पांडुरंग जगदाळे,नवनाथ भाऊ पवार, सोमनाथ पवार, उध्दव सोनवणे, के.डी.निकम, यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

