दिनांक १४/२/२०२० ला वेलंटाईन डे चे औचित्य साधून श्री. साई सेवा संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने मोरवा स्थित श्री साई मतिमंद शिक्षण संस्था व्दारा संचालीत स्वीकार दुर्बल मनस्क ( मतिमंद) मुलांची निवास शाळा, येथे दंतचिकित्सा कॅम्प घेऊन साजरा करण्यात आली.
सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानि रेजोनन्स इन्स्टिट्यूट चे दंतचिकित्सक डॉ. सूरज करवाडे व प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन गाटकीन, सहसचिव विनोद गोवरदिपे व शिक्षण सं संस्थेचे प्राचार्य श्री मोरे सर यांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात सकाळी ११.०० वा घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य भागवत खटी, सुरेश सातपुते , पंकज नागरकर , प्रतीक लाड रूपेश महाडोळे , सुनील मुसळे व रेजोनन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली

