*वर्धा नगर परिषदेच्या डंपिंगला सकाळी भीषण आग लागली* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
 |
| Add caption |
आणि डंपिंग जवळपास जळुन खाक झाले, ही आग कुणीतरी लावल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे, २२ दिवस नगर परिषदेच्या डंपिंग वरील कामगारांसाठी आंदोलन केले,प्रचंड मेहनत घेतली अनेक लोकांना भेटलो,चर्चा केली ,भांडलो,शिव्या दिल्या ,धमकीही दिल्या आणि आंदोलन यशस्वी केले, वाटले होते आता तरी कामगारांना चांगले दिवस येतील आणि त्यासाठी काल-परवा आंदोलनामध्ये मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीसोबत चर्चा झाली आणि कामगारांना पूर्ण वेतन देण्याचे ठरलेही, मात्र आज ही बातमी कानावर आली आणि धक्काच बसला, केलेले कष्ट डोळ्यासमोर आले आणि डोळ्यात पाणी आले, प्रचंड मानसिक तणाव होत आहे, ज्या व्यक्तीने हे नीच काम केले त्याने किमान हा विचार तरी करायला हवा होता की एकदा ठेकेदार श्रीमंत आहे तर तो नुकसान सहन करेलही मात्र नगर परिषद आणि कामगारांचे काय?? जुन्या मुख्याधिकारी, नगर परिषद प्रशासन व सभागृहातील सदस्य-नेते यांनी मोठ्या कष्टाणे डंपिंग उभारले होते एक स्वप्न बघितले होते त्या स्वप्नांचा चुराडा झाला, ही आग त्या सर्वांच्या स्वप्नांना आहे, ही आग कामगारांच्या घराला लागलेली आग आहे, माझ्या मेहनतीला लागलेली आग आहे, या विकृत मानसिकतेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी...