- औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 ज्या
शिक्षकांनी आपल्याला चांगले वळण संस्कार लावून योग्य ठिकाण दाखवलं अशा शिक्षकांना तुम्ही कधीच विसरू नका असा सल्ला आमदार प्रशांत बंब यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. शनिवारी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयातील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ तसेच आमदार प्रशांत बंब यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आमदार प्रशांत बंब बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापुर बाजार समितीचे माजी सभापती अॅड आसाराम पाटील रोठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवगीरी महाविद्यालयातील प्रार्चाय शिवाजी थोरे,शाळेचे सचिव बाबासाहेब नेमाने,माजी सरपंच प्रदीप भुजबळ,आमदार प्रशांत बंब यांचे स्वियसायक रज्जाक पठाण, मुख्याध्यापक योगेश उगले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील जाधव,ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे,सुरेश जाधव,भगवान कवडे,राजेश खंडेलवाल, बाळु चव्हाण,दिगंबर जगताप, आदींची उपस्थिती होती. आमदार प्रशांत बंब पुढे बोलतांना म्हणाले की माझे देखील दहावी पर्यंत चे शिक्षण लासुर स्टेशन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालेले असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी दहावी नंतर एक ध्येय निश्चित करून स्वच्छ मनाने जिद चिकाटीने पुढच्या शिक्षणाकडे मार्गक्रमण करावं यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
