3अपत्येअसल्याचा ठपका घोटीच्या सरपंच पद रद्द? इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील प्रतिस्टतेचि समजलेली जाणारी निवडणूक व पहिलीच थेट जनतेतून सरपंचाची निवडणूक या दृष्टीने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी प्राध्यापक मनोहर घोडे व धोंडीराम कौले हे दोन उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते यात मनोहर घोडे निवडून आले होते त्यावेळी कौले यांनी घोडे यांना 3 अपत्ये असल्याचे निवडणूक अधिकारी यांना सांगितले पण त्यांचे म्हणणे निकाली काढले सरपंच म्हणून मनोहर घोडे यांची वर्णी लागली. दरम्यान कौले यांनी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांचे कडे दावा दाखल केला.सागर यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंद वहीच्या पुरावा ग्राह्य धरत मनोहर घोडे यांचे सरपंच पद रद्द केल्याचे आदेश दिला आहे, 23 जुलै २०१९ रोजी घोटी ग्रामपालिका निवडुन पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीत १२सप्टेंबर२००१ नंतर 3अपत्ये असलेल्या उमेदवार निवडणूक लढवण्यांस अपात्र असल्याचा सरकारने कायदा केला होता त्यानुसार घोडे यांना 3 अपत्ये सिद्ध झाल्याने त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले . दरम्यान आमचे प्रतिनिधी यांनी घोडे यांना संपर्क केला असता मला हा निर्णय मान्य नसून आयुक्त व सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले.इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृत्ती मेदडे बातम्या व जाहिराती साठी संपर्क ९८२२५०२१५७