*सीएससी व आपले सरकार सेवा केंद्र मार्फत शेतकरी कर्जमाफी चे ऑनलाईन व्हेरिफिकेशनला सुरुवात* :- जिल्हा प्रतिनिधी चेतन बांगर
वाशीम जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा करिता महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना

सुरू केली असून दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे व कळंबा महाली येथे शेतकऱ्यां चे कर्जमाफीची करिता ऑनलाईन व्हेरिफिकेशन करण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांची बँकेची बँकेच्या पासबुक वर असलेले नाव यांचे आधार वरील नाव त्यांचे बँकेचा खाते क्रमांक मोबाईल नंबर बरोबर आहे किंवा नाही याची व्हेरिफिकेशन सीएससी सेवा केंद्राचे केंद्र संचालक व आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र संचालक यांच्यामार्फत या दोन गावामध्ये आज प्रायोगिक तत्वावर व कळंबा महाली येथे सीएससी चे वाशिम जिल्हा व्यवस्थापक जिल्हा श्री भगवंत कुलकर्णी सर यांच्या शासकीय कर्मचारी सुद्धा उपस्थित होते श्री भगवंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबा महाली येथील आपले सरकार सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी खूप मोठी गर्दी केली होती तसेच सावरगाव येथील केंद्र संचालक श्री पाटील यांच्या केंद्रावर आपले सरकार सेवा केंद्र चे जिल्हा व्यवस्थापक श्री देशमुख सर व सीएससी चे डिस्टिक कॉर्डिनेटर महावीर साळवे सर तसेच शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे व कळंबा महाली येथे ही योजना सुरू झाली आहे शेतकर्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा