सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*105 कुष्ठरुग्णांना कपडे वाटपासह पार पडला जिव्हाळा सेवाभावी संस्थेचा तृतीय वर्षपूर्ति सोहळा* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार 







"संस्थेकडून तीन वर्षात 830 रक्तदात्यांद्वारे मोफत रक्तदान व 30 अत्यंत गरीब रुग्णांना केली गेली भरीव आर्थिक मदत" वर्धा:- समाजातील अत्यंत गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांचा उपचार पूर्ण करने व गरजू रुग्णांना मोफत रक्तदाते पुरवठा करने हे मूळ उद्देश् घेवून निरंतर कार्य करणाऱ्या जिव्हाळा सेवाभावी संस्थेच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्त कपडा असोसिएशन, वर्धा व विविध दानशूर लोकांच्या सहयोगातून महारोगी सेवा समिती, मनोहर धाम, दत्तपुर येथील 105 कुष्ठरुग्णांना 08 फेब्रुवारी ला सकाळी कपडे वितरण करण्यात आले. याप्रसंगीे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम मडावी सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिच्या प्रेरणेतून जिव्हाळा सेवाभावी संस्थेची स्थापना झाली त्या निकिताच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त व संस्थेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संस्थेचा तृतीय वर्षपूर्ती सोहळा दिनांक 08 फेब्रुवारी ला सायंकाळी दाते सभागृह, वर्धा येथे उत्साहात पार पडला. गुरुदेव सेवा मंडळ, आर्वी नाका वर्धा यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर स्व. निकिताच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रम सुरू झाला. प्रास्थाविकपर भाषणात संस्थेच्या सचिवांनी संस्थेकडून मागील तीन वर्षात राबविल्या गेलेल्या विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती देतांना सांगितले की, जिव्हाळा परिवारकडून 30 अत्यंत गरजू रुग्णांना भरीव आर्थिक मदत करुन त्यांचे उपचार पूर्ण केले गेले आणि गरजू रुग्णांना आतापर्यंत 830 रक्तदात्यांद्वारे ऑन कॉल सावंगी, सेवाग्राम व सरकारी रुग्णालय येथे मोफत रक्तदान केले गेले. यासोबतच वर्धेतून 800 किलोमीटर वरील पूरग्रस्त सांगलीतील दुर्गम खेड्यात जावुन पूरग्रस्तांना उपयोगी साहित्याची थेट मदत केली, कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच झोपणाऱ्या 48 गरजू लोकांना रात्रीच्यावेळी ब्लैंकेट वाटप, शासकीय रुग्णालयाच्या मदतीने संस्थेतर्फे 233 अपंगांना व्हीलचेअर तीनचाकी सायकल अंधकाठी कर्णयंत्र व कुबड्या ई. चे वाटप, मतिमंद व अनाथांना स्वेटर वाटप, गरजवंताना रेशन वाटप, अनाथालयात अन्नदान व आर्थिक मदत, वृक्षलागवड व संवर्धन असे अनेक समाजूपयोगी उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी निसर्ग सेवा समितीचे श्री बेलखोडे सर, फुटपाथ स्कूल चे श्री मोहित सहारे, बांगडापुरचा जलयोद्धा श्री विशाल बांगडे, नवनियुक्त न्यायाधीश श्री प्रवीण पाटील व श्री राहुल रणनवरे, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू श्री संतोष वाघ, युवा रुग्णसेवा ग्रुप वाशीम चे श्री शिवा सावके, दाते सभागृहाचे श्री योगराज दाते व मेहरबाबा अन्नछत्र समिती, वर्धा या सर्व मंडळींचा त्यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यातील मोठ्या सहभागासाठी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करविण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री संत सयाजी महाराज, अध्यक्षस्थानी सावंगी रुग्णालयाचे श्री अभ्युदयजी मेघे, तर प्रमुख अतिथि म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पियुष जगताप, श्री लहानुजी महाराज संस्थानचे श्री बाळासाहेब पावडे, निसर्ग सेवा समितीचे श्री मुरलीधरजी बेलखोडे, विश्वशांती धाम येळाकेळी चे श्री दंडारे सर, आसमंत स्नेहालयाचे श्री शिवाजीदादा चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या अशाच सहभाग, सहकार्य व सुचनेच्या सदैव प्रतीक्षेत ........
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com