*शेतकऱ्याच्या शेत माल साठवणूक करिता श्री . नगाजी महाराज शेतकरी बचत गट यांचे जिल्ह्यातील प्रथम गोदाम* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील टेंभा गावामध्ये श्री . नगाजी महाराज शेतकरी बचत गट यांनी नानाजी देशमुख संजवणी प्रकल्पाअंतर्गत टेंभा या गावात संपूर्ण गावातील शेतकरी एकत्रित येऊन शेतात गोदाम उभारणी केली असून यासाठी अनुदान रक्कम 564856 /- रुपयाचा धनादेश मा . आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या आमदार निधीतून देण्यात आला .असून मा . आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनातून हे गोदाम उभारणी करण्यात आली . हा गोदाम प्रकल्प तालुका क्रुषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाला असून यावेळी मा . आमदार समीर कुणावार , माजी जि .प . अध्यक्ष मा . नितीन मडावी , उपविभागीय क्रुषि अधिकारी श्री . घोडमारे साहेब , तालुका क्रुषि अधिकारी श्री .मेश्राम साहेब यांच्या हस्ते अनुदान रक्कमेचा धनादेश स्विकारतानी श्री . नगाजी महाराज शेतकरी बचत गट चे अध्यक्ष अंकुश कांमडी , सदस्य नगाजी ढगे , देवेंद्र कांमडी , संतोष हूलके , गजानन कांमडी , विनोद वर्भे यांनी उपस्थितीत राहून धनादेश स्विकारला यावेळी मनोज वर्भे , रवींद्र वाघमारे , योगेश उघडे , अमोल उमाटे तसेच गावातील नागरिकांनी सर्वांचे आभार मानले . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
