सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

श्री रामायण- एक चिंतन मिरज विद्या समिती मिरज या संस्थेच्या सौजन्याने. श्री रामायाण-एक चिंतन.प्रवचनमाला विद्या मंदिर प्रशाला मिरज येथे सुरु झाली.






 शनिवार दि :- 25 जानेवारी 2020 रोजी या प्रवचनमालेचा प्रारंभ झाला. या वेळी संत सेवा संघाचे वक्ते प.पूज्य संजय गुरुजी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा.श्री शैलेश ( दादा ) देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रतिमा पूजन श्रीराम यांचे पूजन संजय गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वर्निमाताई आणि जीवनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफताना संजय गुरुजी म्हणाले भारत भूमीत जन्म होणे ही खुपच भाग्याची गोष्ट आहे. विदयार्थ्याचा अर्थात मानवी जीवनाचा व व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचे सामर्थ्य रामायणामधे आहे.चारित्र्य आणि राष्ट्र घडवण्याचे सामर्थ्य रामायणामधे आहे.समाजाच्या उन्नयनासाठी त्यांनी रामायणातील अनेक उदाहरणे आणि दाखल्याचा वापर आपल्या श्री कंठातून केला. संस्थेच्या पर्यवेक्षिका सौ.समेधाताई देशपांडे ,संचालक अमोघदादा कुलकर्णी, श्री.ग्रामोपाध्ये उपस्थित होते. ही प्रवचनमाला 25 जानेवारी 2020 ते 29 जानेवारी 2020 अखेर सायंकाली 6 ते 8 या वेळेत विद्यामंदिर प्रशाला,मिरज.येथे आयोजित केली आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com