सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*बल्लारपुरात संक्रांतीच्या वाणामध्ये दिल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या.* देशात २०२१ मध्ये जनगणना होणार आहे. मात्र त्यामध्ये ओबीसींसाठी नमुद करायला काॅलम नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड, 


भुमीपुत्र युवा बहुउद्देशीय संस्था, नॅशनल ओबीसी फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, ओबीसी महासंघ सारख्या अनेक संघटना ओबीसी जनगणनेबाबत आग्रही आहेत. अंजलीताई साळवे यांच्या पाटीलावा मोहीमेतील पाट्या लावा मोहीम जोरात सुरू आहे. अशातच सध्या संक्रांतीसाठी सर्वीकडे महिला विविध प्रकारचे वाण देण्याची प्रथा असतांना बल्लारपुरात वाणामध्ये "जनगणनेमध्ये ओबीसींचाच काॅलम असावा" अशाअश आशयाच्या पाट्या देण्यात आल्या. सौ माधुरीताई खुटेमाटे यांच्याय पुढाकारातुन जिजाऊ ब्रिगेडच्या अॅड. प्रिती पावडे, अर्चनाताई फरकाडे, लताताई भेंडारकर, मंजुषाताई सरोदे, सारिका पायताडे, निकीता खाडे, पौर्णिमा वैद्य या महिलांनी वाणामध्ये या ओबीसी जनगणनेच्या पाट्या वाणामध्ये दिल्या. जिल्ह्यात मराठा सेवा संघाचे दिनेश पारखी यांची जनजागृती जोरात सुरू असतांना अंजलीताई साळवे यांच्या पाट्या मोठ्या प्रमाणात घरांवर लाऊन दिसत आहे. बल्लारपुरात विवेकभाऊ खुटेमाटे, चंद्रशेखर भेंडारकर यांच्यासारखे अनेक व्यक्ती या कार्यात लागुन आहे. महिलांनी आता वाणामध्ये ओबीसी जनगणनेच्या पाट्या द्यायला सुरूवात केल्यामुळे येत्या काळात ओबीसी जनगणनेचा मुद्दा महत्वाचा ठरणार हे मात्र नक्की.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com