पप्पु राकडे तालुका प्रतिनिधी *जि. प.प्रशाला बाबरा येथील विद्यार्थीनींचे यश* राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत (NMMS) प्रशाला बाबरा शाळेचे यश....
फुलंब्री तालूक्यातील जि. प. प्रशाला बाबरा शाळेने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केले आहे.8 डिसेंबर 2019 रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा निकाल 22/01/2020 रोजी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत विद्यार्थिनी कु. फारेहा मुकीम शेख व कु. प्रतिक्षा बाळू मेहतर या विद्यार्थींनी शिष्यवृत्तीस पाञ ठरल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल मार्गदर्शक वर्गशिक्षक श्रीमती कोळी व श्री. गोंगे सर , मुख्याध्यापक नवले सर, केंद्रप्रमुख भोपळे सर यांनी अभिनंदन केले आहे.