*जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण करणाऱ्या चारही आरोपींची ओळख पटली, दोघे ताब्यात तर दोघांचा शोध सुरु* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
जालना विनयभंग प्रकरणातील पोलिसांना चारही आरोपींची ओळख पटली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी कारवाई केली आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. *आतीश अण्णा खंदारे, सुशील साहेबराव वाघ, कारभारी रामभाऊ वाघ अशी आरोपींची नाव आहे. ज्या आरोपीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला तो अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका प्रेमी युगुलाला टोळक्याने मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. एकमेकांना भेटण्यासाठी आलेल्या या जोडप्याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. दोन मुलं या जोडप्याला बेदम मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर अन्य एक मुलगा मारहाणीची व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ जालना परिसरात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सर्वात आधी एबीपी माझाने हा प्रकार उघड केल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईला वेग आला आहे.*
