*शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून चिंतामुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याबाबत मा . मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा . उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033* स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील विदर्भ युवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून चिंतामुक्त करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याबाबत मा . मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा . उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब हिंगणघाट यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले . मागील तीन ते चार वर्षापासून शेतकऱ्यांना सतत दुष्काळी परस्थीतीचा सामना करावा लागत असून याही वर्षी शेतकऱ्याचा हातात आलेले कापूस , तूर आणि सोयाबीन हे पिक अवेळी येणाऱ्या पावसामुळे आणि गारपीटा आणि निर्सगाच्या संकटामुळे गमवावे लागले , त्यातही कापसाला आणि सोयाबीन ला उत्पादन खर्चा पेक्षा कमी भाव असल्याने शेतकऱ्या समोर जगावे की मारावे ही परस्थीती निर्माण झाली आहे . नवीन सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना आपला सातबारा संपूर्ण कोरा होईल असे वाटत होते . पण नवीन सरकारने सुध्दा शेतकऱ्याना दोन लाख पर्यंत ची कर्ज माफी करून देण्याचे आश्वासन देऊन हातात तुरी दिल्याचे समजते . सत्तेवर येण्याच्या आधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु असे आश्वासन देणारे गेले तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा आहेत.त्यामुळे सरकारने पावसामुळे आणि अवकाळी झालेल्या गारपीटामुळे सर्व शेतमालाची पाहणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25000 रुपये दुष्काळी निधी जाहिर करून 2 लाख पर्यंत ची कर्ज माफी रक्कम ही शेतकऱ्याला तुटपुंजी आहेत , 2 लाख पर्यंत ची कर्ज माफी करून शेतकरी चिंतामुक्त होणार नाहीत तर जिवन मुक्त होईल त्यामुळे शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करावा आणि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करून दिलेले आश्वासन पाळावे असे निवेदन विदर्भ युवा शेतकरी संघटनेचे राहुल दूरतकर , निखिल भाऊ वाघ , विकास तिजारे , सागर बोंद्रे , आशिष ढगे , सचिन महाजन , संदीप सुपटकर , मनोज बावणे , किरण बोंद्रे , कुणाल मेटानंगळे , निखिल सुपारे , महेश निंबाळकर , स्वणील जिवतोडे आदी युवा शेतकऱ्यानी दिले . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*
!doctype>