सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*प्रीटी यु फौंडेशन ने वारकऱ्यांच्या सेवेचा ध्यास घेत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करत केली रुग्ण सेवा.* *प्रतिनिधी : प्रसाद पवार (नासिक)*




 श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर येथे होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातुन शेकडो किलोमीटर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी गणेशनगर नासिक येथील प्रीटी यु फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अनिता बेंडाळे आणि त्यांची मुलगी डॉ. प्रियंका बेंडाळे व टीमने दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन प्रीटी यु फौंडेशन च्या मार्फत वैद्यकीय तपासणी करत वारकऱ्यांना गोळ्या औषधे, इंजेक्शन देत उपचार केले. यात प्रामुख्याने सर्दी, थंडी-ताप, हात पाय दुखणे, पायाला आलेले फोड, पित्त यावर तपासणी करून उपचार करण्यात आले. पिंपळगाव बहुला येथे 17/01/2020 रोजी पाथरे येथील उतरलेल्या दिंडीतील जवळपास 100 वारकऱ्यांवर उपचार केलेत. तसेच दुसऱ्या दिवशी त्यांना चहा, नास्ता देखील देण्यात आला. सद्गुरू नगर येथे मुखेड येथील उतरलेल्या दिंडीतील 50 वारकऱ्यांवर उपचार करण्यात आलेत. दुसऱ्या दिवशी 18/01/2020 रोजी पहाटे बळी मंदिर येथे मालेगाव येथील उतरलेल्या दिंडीत 70 वारकऱ्यांवर उपचार करण्यात आलेत. सकाळी अशोक नगर येथे शिरवाडा-वणी येथिल दिंडीतील 90 वारकऱ्यांवर औषध, उपचार करण्यात आले तसेच संध्याकाळी अशोक नगर पोलीस चौकी येथे शिवूर येथील उतरलेल्या दिंडीतील जवळपास 150 वारकऱ्यांना गोळ्या, औषधे, इंजेक्शन देण्यात आले. तसेच पालखेड येथील 100 वारकऱ्यांना गोळ्या, औषधे मोफत तपासणी करून देण्यात आली. या शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी अनिकेत गोंगे, प्रसाद पवार, विष्णू दवणे, विद्या दवणे, जयश्री पवार, तृप्ती पवार, अपूर्व पवार, तुषार नेमाडे, मित नेमाडे यांनी मदत केली.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com