सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*सांस्कृतिक महोत्सव ** दि. 26/01/2020ला वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :- 


जि.प.उ.प्रा.शाळा,कुरझडी (जामठा) येथे प्रजासत्ताक दिनाचे तसेच भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष मा. श्री. दिनेशराव धनविज आणि गावकरी मान्यवरांनी जिल्हा परिषद शाळेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापक मा.श्री. रविंद्र लवने व सर्व शिक्षकांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणराज्यदिनाच्या प्रसंगी शा.व्य.समिती अध्यक्ष मा.श्री.सुभाषराव सिडाम,सर्व सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच मा.किरणभाऊ चौधरी सर्व सदस्यगण,गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकवर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मनोजकुमार कवडे ,कोरिओग्राफर सौ. लिना गाडे, सौ. हर्षा रोडे ,म्यूझिक सिस्टिम श्री. सतीश करनाके यांनी केले. या कार्यक्रमाला स्वर्गीय मा.सुनीलभाऊ देवढे यांच्या भार्या आणि सहकुटूंबांनी विद्यार्थांना खाऊ वाटप करुन शाळेला देणगी दिली.वर्ष भरातील विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व अभिव्यक्त होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कौतुकाची थाप म्हणून गावकर्‍यांनी सढळ हाताने भरभरुन नगदी रुपात पारितोषिक दिली. 'संदेशे आते है।'या ओतप्रोत देशभक्ती समरगीताने नागरिकांच्या मनावर दस्तक दिली. सर्व आपल्या जागेवर खिळून उभी झाली. "जिस दिल में देशभक्ती हैं। वह सभी देशके सिफाई हैं।" सौ.छाया राडे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com