सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कन्नड तालुक्यातील जवखेडा( बू. )येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव वाडी या शाळेला एक स्मार्ट टिव्ही व एक प्रिंटर भेट देण्यात आले. 


ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा हायटेक बनवण्यासाठी जवखेडा बू. येथील ग्रामपंचायतीने एक पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या वाढावी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेची ओढ लागावी त्यानिमित्ताने जवखेडा बू येथील ग्रामपंचायत सरसावली आहे. ग्रामीण भागातील पालकांचा ओढा सध्या इंग्रजी शाळेकडे असून सर्वच पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकू शकत नाही. आज जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या प्रवाहात आणण्यासाठी जवखेडा बू येथील ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाचा अंतर्गत एक टिव्ही, एक प्रिंटर, एलईडी संच भेट देण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अजय मातेरे, उपसरपंच कृष्णा मोरे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब आघाडे, दिंगबर विसपूते, राजेंद्र कच्छवे, संजय शिखरे,रमेश तात्या मोरे, आनंदा आघाडे, कैलास सोनगिरे, कौतिक जाधव, शालेय समिती अध्यक्ष काकासाहेब मोरे,मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, विठ्ठल काचोळेसह शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com