सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*युवा प्रेरणा संस्थेचा युवा दिन व वार्षिक सांस्क्रुतिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमचा समारोप.*





 स्थानीय वड्णेर येथील आर .टी . आय ग्रूप ऑफ एजुकेशन इंस्टिट्यूट मध्ये युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थे अंतर्गत दहाव्या संस्था वर्धापन दिनानिमित्य सात दिवशीय युवा दिन व वार्षिक सांस्क्रुतिक स्नेह सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वड्णेर च्या ग्राम पंचायत सरपंच सौ . कविताताई विनोद वानखेडे , मार्गदर्शक प्रथम शिक्षण संस्थेच्या जिल्हा समन्वयक सौ . श्वेताताई संजय धोटे , प्रमुख उपस्थिती युवा प्रेरणा संस्थेचे उपाध्यक्ष श्री . किरणकुमार चंद्रकांत गहूकर , सचिव सौ . सुषमा गहूकर , शिवसेना प्रणीत युवा सेना हिंगणघाट चे तालुका अधिकारी श्री . निखिलभाऊ वाघ , पोहणा सर्कलचे देशोंन्नती पत्रकार श्री . जगदीशभाऊ घूगरे , सत्कारमूर्ती युवा प्रेरणा संस्थेच्या सदस्या कु . श्रुतीताई जयस्वाल , कार्यक्रमाचे आयोजक युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार राहुल दूरतकर , कार्यक्रम अधिकार विकास तिजारे , वेणी चे शाळा व्यवस्थापण अध्यक्ष श्री . दशरथ लोणबळे आधी मान्यवरांची उपस्थिती होती . सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. संस्थेने गेली दहा वर्षापासून अनेक समाज उपयोगी कामे शिक्षण आणि सामाजिक शेत्रात केली . विद्यार्थी व युवकांकरिता वक्रूत्व स्पर्धा , निबंध स्पर्धा , वादविवाद , संगीत , आणि स्पर्धा परीक्षा विविध स्पर्धा घेण्यात आल्या असे मत संस्थेचे अध्यक्ष राहुल दूरतकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले . संस्थे अंतर्गत घेण्यात आलेल्या भारतीय शेती समोरील आव्हाने या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु . साक्षी गुरुनुले , दुत्तीय क्रमांक कु . रुचीता भारस्करे, तुत्तीय क्रमांक कु .भूमिका मून , कु . पायल खेलपांडे तर डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम गुणवत्ता स्पर्धा परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक कु . ममता बावणे , कु . गायत्री उगेमूगे , दुत्तीय क्रमांक कु . मनिषा वांढरे , कु . नंदिनी चिंचोलकर , तुत्तीय क्रमांक कु . जयश्री वांढरे , कु . तेजस्वी सातपुते यांना डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम ब्रिलन्सि अवार्ड स्मुती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . त्यांच्या प्रमाणे सामाजिक आणि शैक्षणिक शेत्रात उत्क्रुष्ट कार्य करणारी कु . श्रुती ओमप्रकाश जयस्वाल यांना स्वगीय चंद्रकांत गहूकर यांच्या स्मुती पित्यर्थ स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार शालशीफल स्मुतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .त्याच प्रमाणे बाल संगीतकार कु . श्रेया दशरथ लोणबळे तर उत्क्रुठ वक्रूत्व म्हणून कु . आचल तागडे यांना डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम ब्रिलन्सि अवार्ड शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढी समोरील आव्हाने या विषयावर मनोगत व्यक्त केले . संस्थेने ग्रामिण तरुणाला एक व्यासपीठ निर्माण करून दिले असे मत श्री . निखिलभाऊ वाघ यांनी व्यक्त केले . या संस्थेच्या माध्यमातून हिंगणघाट तालुक्यात तरुणाला योग्य दिशा दाखविण्याचे मोलाचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरु आहेत असे मत सौ . श्वेताताई धोटे यांनी व्यक्त केले . समाजामध्ये तरुणांनी जबाबदारी ने वागावे आणि आपले आयुष्य घडविण्यात वेळ द्यावा असे मत अध्यक्षीय भाषणातून सौ .सरपंच कविताताई वानखेडे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शिक्षिका कु . विभाताई गुरुनुले , सौ . कल्याणी ताई उरकुडे , सौ . आरतीताई बोरकर , नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सचिन महाजन , कु . प्रियाताई कोल्हे , भाग्यश्री वंजारी , प्रतीक्षा इंगोले , योगीता आंबटकर , वैष्णवी तिजारे , प्रीती पंढरे , संजना पाटील व मोठया प्रमाणात विद्यार्थीची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन रंजित एकनाथजी वांढरे तर आभार प्रदर्शन कु . आचल तागडे यांनी केले . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com