सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*रेणा साखर कारखान्याचे नूतन संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याबद्दल संचालक मंडळ यांच्याकडून सहकार महर्षी माजी मंत्री रेणाचे संस्थापक दिलीपराव देशमुख यांचा सत्कार संपन्न.* प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रद येळकर.


 लातूर दि.22 जानेवारी 2020 राज्यात सहकार क्षेत्रात विशेषतः साखर उद्योगामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मांजरा साखर परिवारातील रेणा साखर कारखान्याचे नूतन संचालक मंडळ बिनविरोध निवडण्यात आले यामागे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रेणा साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहेत विशेष म्हणजे प्रथमच या नूतन संचालक मंडळात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. रेणा साखर कारखान्याचे १९ सन्माननीय संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याबद्दल रेणा साखर कारखान्याचे संस्थापक मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार बुधवारी आशियाना निवासस्थानी करण्यात आला. रेणा साखर कारखाना दीलीपनगर (निवाडा) तालुका रेणापूर नूतन संचालक मंडळात माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख(बिगर उत्पादन संस्था, उत्पादन संस्था.पणन) आमदार धीरज विलासराव देशमुख(बाभळगाव गट) आबासाहेब पाटील(बाभळगाव गट) प्रवीण पाटील (बाभळगाव गट) सर्जेराव मोरे (पोहेरेगाव गट) माजी आमदार अँड त्रिंबक भिसे(पोहरेगाव गट) यशवंतराव पाटील (पानगाव गट) धनराज देशमुख (पानगाव गट) हरिदास संजय निवृत्ती (पानगाव गट) ठाकूर अनंत दत्तात्रय (खरोला गट) चंद्रकांत मारुती सूर्यवंशी (खरोळा गट) प्रेमनाथ आकनगिरे(रेणापूर गट) पाटील सुहास भगवानराव (रेणापूर गट) संग्राम माटेकर (रेणापूर गट) दगडू तानाजी कांबळे (अनुसूचित जाती जमाती) सौ अमृता स्नेहल देशमुख (महिला प्रतिनिधी) माने वैशाली पंडित (महिला प्रतिनिधी) रेड्डी संभाजी रामकिशन (इतर मागासवर्गीय) हाके शहाजीराव (विमुक्त जाती) यांचा समावेश आहे. रेणा साखर कारखान्या च्या १९ जागेसाठी १९ अर्ज निवडणूक अधिकारी समृत जाधव यांच्याकडे आले होते आज बुधवारी छाननी करण्यात आली त्यात सर्वच सर्व १९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे १९ संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहेत. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे उपस्थित होते. मांजरा परिवारातील गेल्याच पंधरवड्यात विलास साखर कारखान्याची निवडणूक झाली होती त्या ठिकाणी सुद्धा बिनविरोध सर्व संचालक निवडून आले आहेत त्यामुळे मांजरा साखर परिवारात कारखान्याच्या नीवडणुका बिनविरोध निवडून होण्याची परंपरा सुरू झाली आहे याचे श्रेय लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कडे जाते तोच पॅटर्न पुढे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुढेही चालू राहील अशी अपेक्षा आहे. बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क 7030704553.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com