सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
प्रेसनोट

 वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांच्या समोर माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुंबई येथे मांडल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची माजी आमदार राजू तिमांडे यांची मागणी. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*



हिंगणघाट:- 23 जानेवारी 2020 अवकाळी पावसामुळे गारपीट झालेल्य शेतकऱ्यांना सरकार तर्फे त्वरित सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी तसेच खरीप व रब्बीच्या हंगामात झालेली दुबार व तिबार पेरणी सतत पडलेला अडीच महिने पाऊस परतीच्या पावसामुळे खराब झालेली पिके 2 टप्प्यांमध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिकाची सर्वेक्षण फेरतपासणी करून आणेवारी 50 टक्क्यांच्या आत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत दिनांक 23 जानेवारीला मुंबई येथे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनीलजी केदार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी सुमारे 4 ते 4.30 वाजताच्या दरम्यान वादळी पाऊस व वाऱ्यासह लिंबाएवढ्या झालेल्या गारपिटीमुळे बुरकोणी, लाडकी, चिचघाट, काजलसरा ,पारडी तसेच मानोरा सकाळी भाग शेतातील चना गहू कपाशीची पिके निसतेनाभूत झाली आहे. त्यासोबतच सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस व तुरळक गारपिटीने खरीप व रब्बी पिकांची हानी झाली आहे दुपारच्या अवधीनंतर संपूर्ण तालुक्यात पावसाने कहर केला. जनाच्या पिकाची फुलोऱ्यावर गारपिटीच्या मारामुळे झाडाने अक्षर शा तुकडे पडून संपूर्ण शेत हिरवेगार झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात आलेले पिक पूर्णतः नष्ट झाले आहे मुसळधार पावसामुळे शेतात खालन भागात पाणी साचले आहे ओलतीच्या चण्याला गारपीट व पावसामुळे रोगाचा सामना करावा लागत आहे. गव्हाचे पीक उमेदीत व गाभार्‍यात असताना गारपिटीच्या माराने तुटून पडले आहे ओंबीवर असलेले गावाचे पीक वादळी वारा मुसळधार पाणी व गारपिटीमुळे तुकडे पडून झोपले आहे. तुरीच्या उभ्या पिकांवर गारांच्या वर्षावाने शेंगा तुटून जमिनीवर पडल्या असून हिरव्या शेंगा व दाणे सडली आहे तर वाळलेल्या शेंगा चे दाणे गारांच्या वर्षाव आणि जमिनीवर पडल्या असून पडले आहे कापणी वर आलेली तूर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुसतेनाबुत झाली आहे. वादळी पाऊस व गारपिटीमुळे कपाशीच्या ठिकाणे जमिनीवर लोळण घेतली असून कापूस मातीमोल झाला आहे अशाप्रकारे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बी बियाणे, खत ,मशागतीवर व फवारणी वर कर्ज काढून झालेल्या खर्चावर आता भरणा असताना अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले विधेयक चित्र सर्वत्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे. दिनांक 13 जानेवारी ला हिंगणघाट येथे तहसील कार्यालयावर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या माजी आमदार तिमांडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता.तरी सरकारने त्वरित सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com