सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पिशोर ते रामनगर रस्त्याचे काम संथ गतीने, खड्डे आणि धुळीने प्रवासी त्रस्त...!



 पिशोर – शिवूर बंगला ते भराडी रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. यामध्ये पिशोर ते रामनगर दरम्यान चा रस्ता बऱ्याच दिवसापासून ठेकेदाराने उकरून ठेवला मात्र या रस्ताचे काम संथ गतीने सुरु असल्याने प्रवासी खड्डे, आणि धुळीने त्रस्त झाले आहे. या कामासाठी मुरूम न वापरता चक्क माती आणि गाळाचा वापर होत असल्याने सदरील काम अतिशय निकृष्ट दर्ज्याचे काम सुरु असल्याच्या बातम्या वृत्तपत्रामध्ये छापून आल्या होत्या. त्यानंतर ठेकेदाराने थातूर मातुर काम करत या काही ठिकाणी या रस्ताची दबाई केली. मात्र आता अनेक महिने उलटूनही पुढील काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहे. दोन्ही बाजूनी रस्ता उकरून ठेवला असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर दरोज छोटे मोठे अपघात घडत आहे.. खडे तर खडे पण समोर धुळीचे प्रचंड लोट उडत असल्याने जवळून एकादि गाडी गेल्यास समोर काहीच दिसत नाही. धुळीने डोळे भरून जातात त्यामुळे दुचाकीचालक प्रचंड हैराण होत आहे. डोळ्याचे तसेच श्वसनाचे विकार या धुळीने नागरिकांना जडण्याची शक्यता नाकारात येत नाही. या रस्त्यावर ठिकठीकाणी छोट्या पुलांचे काम सुरु आहे. मातीचा मोठा ढिगारा सरळ रस्त्यावरच उभा केला जात असून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सुरक्षेची काळजी घेत नसल्याचे चित्र आहे.. पुढे काम सुरु असल्याचे साधे फलकही लावले नसल्याने रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील हनुमानगर येथे या रस्यावर असणाऱ्या एका मोठ्या खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने दुचाकीस्वार घसरून पडत आहे. या पाण्याच्या दुर्गंधीने आसपास राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ...................................................प्रतिक्रिया...................................................................... १० फेब्रुवारी रोजी सचिन उपाध्ये हा दुचाकीस्वार युवक ट्रक च्या पाठीमागे दुचाकी चालवत होता पण प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार संतोष पवार हे एकमेकांना दिसले नाही आणी अपघाताला निमंत्रण मिळाले. त्यात सचिन उपाध्ये याला आपला जीव गमवावा लागला. तर संतोष पवार हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे हे अतिशय थंड गतीने चालू असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच काम सुरु आहे तोपर्यंत दिवसातून दोन वेळा या रस्त्यावर पाणी मारायला हवे. पि.एम.डहाके, माजी सरपंच पिशोर ................................................................................................................................................. गेल्या अनेक दिवसापासून या रस्ताचे काम कमी आणि तमाशा जास्त अशी परिस्थिती आहे. एक दिवस काम सुरु आणि एक महिना बंद अशी परिस्थिती आहे. धूळ आणि खड्डे यामुळे सर्वसमान्य जनता त्रस्त आहे. संबधित ठेकेदारणे आता लवकरात लवकर काम पूर्ण करायला हवे. जावेद शेख तुराबोद्दिन , पिशोर शिवस्वराज्य बहुजन पक्ष कार्यकर्ता. .......................................................................................................................................................... सदरील काम हे मोठ्या बजेटचे काम आहे निदान अशा कामावर तरी शासकीय यंत्रणेच लक्ष रहायला हव. पिशोर जवळील मोह्न्द्री रोड वर असलेल्या लेंडी नाल्यावरील पूलच या कामातून वगळण्यात येऊन तिथ सरळ रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठी अडचण निर्माण होऊ शकते.' एजाज पठान, पिशोर ......................................................................................................................................................... प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com