सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747 *स्मार्ट पेसी पिंपळगाव शाखेचा पहिला वर्धापन दिन पिंपळगाव (नाशिक) नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न*



 आज स्मार्ट पेसी इन्स्टिट्यूट & टेक्नॉलॉजी सोल्यूशन प्रा.ली. च्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या शाखेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पहिल्या वर्धापण दिनानिमित्त इतर सर्व खर्च टाळून स्मार्ट पेसी ने सामाजिक बांधीलकी जपत वर्धापन दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत व परिसरातील युवक युवती साठी त्यांना कुठेतरी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी स्मार्ट पेसी इन्स्टिट्यूट च्या वतीने वकृत्व स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते.. या वर्धापन दिनानिमित्त स्मार्ट पेसी चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी शिंदे सर, स्नेहल शिंदे , वैजापूर शाखा व्यवस्थापक कैलास जाधव, भारत खिल्लारे ,आदित्य गवळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव बसवंत शाखेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र जाधव सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते... या वकृत्व स्पर्ध्येत एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आणि तसेच यांना कंप्यूटर कोर्स मोफत करण्याची संधी दिली तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले शिवाजी शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना स्मार्ट पेसी इन्स्टिट्यूट लवकरच संपूर्ण नाशिक मध्ये शाखा सुरू करणार असे सांगितले तसेच पिंपळगाव शाखेचे सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनन्दन शिवाजी सर यांनी केले यावेळी आयोजकांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com