सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे पहिला विमान बनविणारा मराठी मुलगा अमेरिकेला गेला. नवनिर्मान चे अध्यक्ष यांची घणघणीत टीका

"सरकारी धोरणांमुळे पहिले भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन



अमोल यादव यांनी महाराष्ट्रामध्ये कारखाना न उभारता नाइलाजास्तव अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये केली आहे. भारतामध्ये थांबण्यासाठी तरुण मुले तयार नाहीत, त्यांना परदेशात जायचे आहे. सरकारने देशामधील शहरे आणि एकंरित व्यवस्थाच बकाल करुन ठेवल्याने तरुणांची ही मानसिकता झाली आहे अशी टीका राज यांनी केली. यासाठी त्यांनी थर्स्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे मालक अमोल यादव यांचे उदाहरण दिले.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com