सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

परतीचा पावसाने शेतकर्या चे मोठे नुकसान:--बाबरा/ववना येथील शेतकरी हवालदिल

*बाबरा येथे पिकांचे नुकसान शेतकरी हवालदिल*


 पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी

 सलग सुरू असलेल्या पावसामुळे सोंगणी झालेल्या मक्का बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला कोंब फुटले आहेत.तसेच शासन शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले असतानाही गाढ झोपेत आहे.एकही लोकप्रतिनिधी, अधिकारी,तलाठी अजून पंचनामा करण्यासाठी आले नाहीत.तर उलट शेतकरी राजाला आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई(विमा) मिळण्यासाठी पुन्हा कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त केलं आहे.मग आधी जमा केलेला सात बारा आधार कार्ड बँक पासबुक हे सर्व डेटा विमा कंपनी कडे असतांना पुन्हा हे कागदपत्रे कशा साठी हा सवाल शेतकऱ्यांनि उपस्थित केला आहे.फुलंब्री तालुक्यात सर्व गावामध्ये सरसकट नुकसान झालेले आहे मग ह्या कागदपत्रे याची अट कश्यासाठी घातली सरसकट पंचनामे करावे ही शेतकऱ्यांची विमा कंपनी व शासनाला विनंती आहे.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com