सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राज्यात अल्प बहुमतातल सरकार बनलं आणि ते पडलं तर पुन्हा निवडनुकीला सामोरे जावे लागेल:---आठवले भाकित

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज मुंबई : राज्यात अल्प बहुमतातलं सरकार बनलं आणि ते पडलं तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल आणि पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धुसर



असल्याचे भाकित आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे. राज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचवर प्रतिक्रिया देताना आठवले माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेने सोबत चर्चा व्हायला हवी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता नसली तरी, त्यांना उममुख्यमंञीपद मिळू शकते. तसेच मंत्रिमंडळात अर्ध्या जागा, केंद्रात आणखी एक मंत्री पद आणि राज्यात चांगली खाती शिवसेनेला मिळू शकतात असा अंदाजही वर्तविला आहे. राज्यात सत्ता स्थापण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्यापेक्षा भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेने कौल दिला आहे, त्यामुळे त्यांनीच सत्ता स्थापली पाहिजे अशी आग्रहाची भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्यात पुन्हा निवडणुकांची परिस्थिती उदभवल्यास भाजप शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. पुन्हा निवडणुका झाल्यास महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धूसर असल्याचे भाकितही आठवलेंनी केले आहे.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com