सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

स्वाभिमानी पक्षांचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांचा सदाभाऊ ना धक्का

पुण॔:--दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांच्या शी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा 
झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षांचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर हे थोड्या वेळात धक्कादायक  राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे 



गेली आठ दहा वर्षापुर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे रवीकांत तुपकर लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ होते. त्यांना राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली होती. ते स्वाभिमा नीत अस्वस्थ असल्याचे पाहून भाजपने त्यांच्याशी संपर्क वाढवला होता. वाटाघाटीनंतर तुपकरांचा भाजपप्रवेश निश्चित झाला होता. यासंदर्भाने त्यांनी आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र तुपकरांनी भाजपमध्ये न येता राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश करून भाजपसाठी काम करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. त्यानुसार तुपकर हे रयत क्रांती संघटनेत आले, मात्र प्रवेशानंतर ते स्तब्ध आहेत. फर्डे वक्ते असलेल्या तुपकरांनी भाजपसाठी एकही सभा घेतलेली नाही. भाजपकडूनही आपल्याला फसवले गेलेय, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळे ते रयत क्रांती सोडून पुन्हा स्वगृही परतणार आहेत.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com