सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

रसना गल॔ ची दुख:द कहाणी माहित आहे का जन्मदिवशिच नशिबाने साथ सोडली

तुम्हांला ‘रसना’ची ती टीव्हीवर येणारी जाहिरात तर लक्षात असेलच, त्यात एक क्युट लहान मुलगी होती जिने ‘आय लव्ह यु रसना’ म्हणत सर्वांचे मन जिंकले होते. आज आपण त्याच मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.


त्या लहान मुलीचे नाव तरुणी सचदेव आहे. तरुणी एक भारतीय मॉडेल आणि बालकलाकार होती. तिचा जन्म १४ मे १९९८ मध्ये मुंबईमध्ये झाला. तिचे वडील हरेश सचदेव एक उद्योगपती आहेत. तिच्या आईचे नाव नीता सचदेव आहे. तरुणी आपले शिक्षण मुंबईत घेत होती. तिची आई राधा गोपीनाथ मंदिराच्या भक्त मंडळाची सदस्य होती. त्यामुळे तरुणीने मंदिराच्या उत्सवाच्या अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. ती वयाच्या पाचव्या वर्षीच इंडस्टीमध्ये आली. ती तिच्या काळातली सर्वात जास्त पैसे कमावणारी बालकलाकारसुद्धा बनली.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com