गंगापूर ची गंभीर परिस्थिती पाहता अमित शहा यांनी प्रचारासाठी येण्यास टाळले :--अमोल कोल्हे यांचा घणघणता वार
गंगापूर तालुक्याची गंभीर परिस्थिती बघता अमित शहा यांनी प्ररचारासाठी येण्यास टाळले - अमोल कोल्हे
औरंगाबाद/गंगापूर प्रतिनिधी सलीम शाह गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील प्रचारासाठी येणारे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी तालुक्यातील एकंदर परिस्थिती खराब असल्याच्या कारणारून येण्याचे टाळले असल्याचा दावा डा. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना केला.
गंगापूर येथील सोमाणी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष माने यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, केजी टू पीजी मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी विनाव्याज कर्ज, दुग्ध व्यावसायिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव हवा असेल तर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आणण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन डा. अमोल कोल्हे यांनी यावेळी करून मतदानाला जाण्यापूर्वी सर्वांनी शिवस्मारकाची एकही वीट न रचणाऱ्या व गड किल्ल्यांचा वापर लग्न व हाटेलसाठी करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, या दिवशी अमित शहा हे पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघामध्ये अशोक बापू पवार आले होते तेथील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार यांची विकासकामे पाहून ते डोक्याला हाथ लावून बसले व त्यांनी गंगापूरची माहिती घेतल्यानंतर इकडे येण्याचे टाळल्याचा दावा केला ते पुढे म्हणाले की विद्यमान आमदाराने दहा वर्षे तुम्हाला म्हणजे जनतेला संधी देउनही वाऱ्यावर सोडले. तसेचं बोलताना ते म्हणाले की या गंगापुर खुल्ताबाद तालुक्यात विकासकामे करायचे असेल तर जनतेने संतोष माने यांना निवडून द्या. तसेचं एम आय एम चे तालुका अध्यक्ष मुसा पटेल यांनी जाहीर पाठींबा संतोष माने यांना दिला. यावेळी आमदार सतीश चव्हाण, मा.आ.कैलास पाटील, मा.आ. आण्णासाहेब माने, संजय जाधव, किरण पाटील, खालेद नाहदी, ज्ञानेश्वर नीळ,शिवाजी बनकर, महेश गुजर,बबलु पोळ, भाऊसाहेब शेळके, मुसा पटेल हे उपस्थित होते.