सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचे तांडव

कोल्हापूर/प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तर दूपारी चार वाजल्यानंतर ढगफुटीसदृष्य पाऊस झाला.


 विजांच्या गडगडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर शहरातील सखल भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱया विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम होणार असून मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. पावसामुळे दिवाळी सणाची खरेदी करणाऱया नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. तर फेरीवाले विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. शुक्रवारपासून जिह्यात परतीचा पाऊस सुरु झाला. शनिवारी दुपारी सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अखेरच्या दिवशी काहीअंशी अडथळा निर्माण झाला. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता पुन्हा काळे ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृष्य पाऊस सुरु झाला. सायंकाळी 7 वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरुच होता. त्यामुळे ओढे, नाले, पुन्हा ओसंडून वाहू लागले आहेत. पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. तर अनेक घरांची पडझड झाली. रविवारी सायंकाळी सलग तीन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे व्हिनस कॉर्नर, लक्षीपुरी व्यापारपेठ, सीपीआर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक आदी शहरातील सखल भागात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, कागल आणि भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर इतरत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. हवामानाच्या अंदाजानुसार प्रशासनाने जिह्यात ठिकठिकाणी वीज पडण्याचा इशारा दिला होता. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. पावसामुळेमतदानयंत्रणेवरताण रविवारी सकाळी निवडणूक कर्मचाऱयांना इव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. पण दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कर्मचाऱयांची तारांबळ उडाली. इव्हीएम मशीन मतदान केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मतदान यंत्रणेवर ताण पडला. दरम्यान सोमवारी मतदानाच्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्यास वीज पुरवठा खंडीत होऊन मतदान प्रक्रियेत कोणताही खंड पडू नये यासाठीही निवडणूक यंत्रणेकडून नियोजन केले आहे. गेल्याचोवीसतासातझालेलापाऊस तालुका पाऊस (मि.मी. मध्ये) हातकणंगले 37.38
शिरोळ 37.86
 पन्हाळा 36.29
शाहूवाडी 35
 राधानगरी 31
गगनबावडा 23
 करवीर 30
 कागल 30
गडहिंग्लज 28.86
 भुदरगड 29.40
 आजरा 38.50
 चंदगड 21.33
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com