सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कन्नड तालुक्यातील भिलदारी येथे परतीच्या पावसाने शेतकर्या चे मोठे नुकसान:---होत्या चे नव्हते झाले शेतकर्या ची कळकळ

पिशोर – कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे सतत सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानिसोबतच घर तसेच विहरींची मोठी पडझड झाल्याने येथील शेतकरी या अस्मानी संकटांसमोर हतबल झाल्याचे चित्र आहे.


 परीसात एन मका, बाजरी काढणीच्या हंगामात आलेल्या या संकटाने मका तसेच बाजरीला जागेवरच कोंब फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यातच डेरेदार अद्रक पीकालाही सड लागत आहे. रामसिंग गोठवाल, विलास कवाळ, कपूर गोठवल, कैलास वैष्णव, नंदु बोर्डे , भगवान राजपूत , चंपालाल राजपूत , आदी शेतकरयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने या भागात अतिवृस्ठी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री भिलदरी येथील सरूबाई बोर्डे या कुटुंबासोबत झोपेत असताना घराची पडझड झाली त्यामुळे घरातील कुटुंब किरकोळ जखमी झाले मात्र घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याचा चुराडा झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्या घटनेत आनंद बोर्डे यांचेही घराच्या मुख्य बाजू कोसळ्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तिसर्या घटनेत ताराचंद बम्नावत आनि एकनाथ गोठ्वाल यांच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले आहे. भिलदरी येथील रहिवासी विजय रामलाल गोठवल यांची मोठा खर्च करून नव्याने बांधलेली विहीर पावसाने पूर्ण पने खाचून मोठे नुकसान झाले. वरील सर्व घटनामध्ये संबंधितांचे मोठे नुकसान झाल्याने अधिकार्यांनी त्वरित दखल घेऊन पंचमाने करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय वैष्णव, चंपालाल राजपूत, गांधी गोठ्वाल, कैलास वैष्णव , अर्जुन राजपूत , हनुमान वैष्णव, नेपाल राजपूत आदींनी केली आहे

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com