निवडणुकीचा सट्टा बाजार तेजीत
सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले
निवडणूक अंदाज, सट्टा बाजार तेजीत .
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी निकाल असून दुपारपर्यंत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील निकालाबाबत कोटी रुपयांचा सट्टा लावला जात आहे. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर व कागल मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. त्यामुळे सट्टा बाजारात या चार मतदार संघातील उमेदवारांवर कोट्यावधींचा सट्टा लावण्यात आला आहे कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे अमल महाडिक व काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत ऋतुराज पाटील यांना मतदारांची पसंती असल्याने सट्टा बाजारात त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. ऋतुराज पाटील यांना 60 पैसे तर अमल महाडिक यांच्यावर 80 पैसे भाव घेण्यात येत होता. कोल्हापूर उत्तर मधील विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रकांत जाधव यांच्यातही चुरशीची लढत झाली. सट्टा बाजारात मात्र दोघांनाही समान 80 पैसे भाव असल्याने विजयी कोण होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. करवीर मतदार संघात काँग्रेसचे पी एन पाटील यांच्यावर 65 पैसे तर शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचा 1रूपया भाव होता. कागलमध्ये राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा 60 पैसे तर अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांचा 1 रुपये भाव होता. ज्या उमेदवाराला जास्त दर असतो तो उमेदवार अडचणीत किंवा पराभूत होणार असतो व ज्या उमेदवाराला कमी दर तो उमेदवार विजयी होणार असल्याचे सट्टा बाजारात मानले जाते. एकंदरीतच कोल्हापुरच्या निकालाबाबत सट्टा बाजारात शेकडो कोटी रुपयांचा सट्टा लागल्याची शक्यता आहे. सट्टा बाजाराचा हा अंदाज खरा की खोटा हे उद्याच स्पष्ट होईल.