बंडखोर तृप्ती सावंत याची शिवसेनेतून हाकलपट्टी
मुंबई | वांद्रे पूर्व मधील बंडखोर नेत्या तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे
त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्राकाद्वारे तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. भाजपने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतही बंडखोरांवर कारवाई होताना दिसत आहे.