'रासप' आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. आमच्यात भांडण आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मात्र माझी स्थिती इकडे आड, तिकडे विहीर अशी आहे. त्यामुळे अन्य कुठलाच पर्याय नाही. त्यामुळे भाजप बरोबरच राहणार आहे,'' अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.
