सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

वाचनप्रिय विद्यार्थ्यानो नवपिढीच्या निर्मिती साठी तुमचे प्रेरणादायी पाऊस

*विद्यार्थ्यांनो ! वाचनप्रिय नवपिढीच्या निर्मितीसाठी तुमचे प्रेरणादायी पावूल* ! *..प्रा.डाॅ.सारिका चौधरी*



 *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट** स्थानीय वड्णेर येथील श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फ डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमीत्य वाचन प्रेरना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.पारेकर सर मार्गदर्शक प्रा.डाॅ.प्रविन कणाके होते व कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डाॅ.सारिका चौधरी व प्रिती सायंकार यांनी केले .डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे भारताला मिळालेला कोहीनुर आहे असे वक्तव्य डाॅ. सारिका चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये केले तसेच त्यांनी डाॅ.ए.पी.जे.कलाम यांचे शिक्षण ,व्यवसाय,व्यक्तीमत्व व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची व लिहीलेल्या पुस्तकांचे स्मरण प्रास्ताविके मध्ये केले. प्रा.डाॅ.प्रविन कणाके यांनी विद्यार्थांना मोबाईल,व्हाट्सअॅप,फेसबुक चा कमीत कमी वापर करुन वाचना कडे लक्ष द्यावे.वाचाल तर वाचाल असे सांगत मन लावून वाचन कसे करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.पारेकर सर यांनी वाचन कसासाठी करावे वाचनातुन कसा लेखक घडतो हे वाचन प्रेरना दिनानिमित्य बोलले.डाॅ.सारिका चौधरी यांनी वाचन प्रेरना दिना निमित्य वाचन सप्ताहचे आयोजन करुन विद्यार्थनां वाचायला पुस्तके देवून त्या वाचलेल्या पुस्तकांचे सारांश इतर शंभर विद्यार्थींना सांगण्यास सांगितले.ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग घेणार्‍या मयुर भोयर ,अंजली साखरकर व कल्यानी इंगोले या विद्यार्थांना पारितोशिक देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ सारिका चौधरी यांनी केले. संचालन मयुर भोयर व कार्यक्रमाचे आभार प्रिती सायंकार यांनी मानले .तसेच या प्रसंगी प्रा.डाॅ.बहादे,प्रा.डाॅ.भोयर ,प्रा.डाॅ.घिनमिने,प्रा.तेलहांडे,प्रा.दिवेकर ,प्रा.मुडे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी नरेश कातडे ,कापसे ,पर्बत ,विद्यार्थी प्रतिनिधी मयुर अंजली साखरकर,सुरज शंभ्भरकर , शिपाई व मोठ्यां संख्येत विद्यार्थी हजर होते.क्रार्यक्रमाचा शेवट हा राष्र्टगिताने करण्यात आला.

*राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट* 9923937033

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com