सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

खुनातील आरोपींना 12तासांचे आत जेरबंद:--वर्धा पोलिसांची कामगिरी

*खुनातील आरोपी १२ तासाचे आत*

वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-


स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात पोस्टे:- वर्धा शहर जिल्हा :-वर्धा अपराध क्रमांक :-1806/2019 कलम :-302, 34 भा द वि अन्वये फिर्यादी :- संकेत संपत बैस वय 18 वर्ष, रा. इतवारा बाजार वर्धा मृतक :- रोहित रामसिंग बैस वय 28 वर्षे रा. इतवारा बाजार वर्धा आरोपी :- 1) शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी, 2) शुभम ऊर्फ ददन राजू मडावी दोन्ही रा. इतवारा बाजार वर्धा घटनास्थळ :- बुरड मोहल्ला इतवारा वर्धा घटना दिनांक :- 27/10/19 चे 23.30 वा दरम्यान हकीकत याप्रमाणे आहे की यातील मृतक व आरोपी क्रमांक 1 यांचा जुना वाद असून जुन्या वादाचे कारणावरून घटना ता. वेळी व स्थळ यातील नमूद आरोपी यांनी संगणमत करून चाकूने मृतक याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारा दरम्यान मृतक याचा मृत्यू झाला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासावर आहे. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पथकास प्रचारान करून विशेष सूचना देण्यात आल्या व मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून मुख्य आरोपी क्र. १ याला बाजारगाव, नागपूर येथून अटक करण्यात आली आहे


 तसेच क्रमांक 2 यास इतवारा बाजार परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करिता पोस्टे वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, यांचे मार्गदर्षनात, पोलीस निरीक्षक श्री. निलेश एम. ब्राम्हणे, स्थानिक गून्हे शाखा, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पथक प्रमुख पो.हवा. संतोष दरगुडे, प्रमोद जांभुलकर ,दिनेश कांबळे,दीपक जाधव पो.ना. चंद्रकांत बुरंगे, तुषार भुते राजेश तिवसकर,संजय बोगा, श्रीकांत खडसे, रामकृष्ण इंगळे पो.काॅ. प्रदिप वाघ सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 8308375118

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com